भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 07:19 AM2019-02-02T07:19:05+5:302019-02-02T11:36:47+5:30
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पुणे- भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज सकाळी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेंना पुण्याला घेऊन गेले असून, आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र 'मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही', असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
Maharashtra: Anand Teltumbde, an accused in Bhima Koregaon case has been arrested by Pune Police from Mumbai this morning. Pune session court had yesterday rejected his anticipatory bail plea.
— ANI (@ANI) February 2, 2019
मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी (21 डिसेंबर) सुनावणी झाली. न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली असून, त्यांना सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांत दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.