अंगणवाड्या होणार आनंदवाड्या!

By admin | Published: December 31, 2014 11:11 PM2014-12-31T23:11:25+5:302014-12-31T23:11:25+5:30

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू असून, त्याला यश येत आहे.

Anganwadi will be joyful! | अंगणवाड्या होणार आनंदवाड्या!

अंगणवाड्या होणार आनंदवाड्या!

Next

बापू बैैलकर - पुणे
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू असून, त्याला यश येत आहे. २०१५मध्ये लोकसहभागातून या अंगणवाड्या ‘आनंदवाड्या’ करण्याचा संकल्प महिला व बाल कल्याण विभागाने केला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणारे विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेत यावेत, यासाठी अंगणवाड्यांची सुधारणा केली जात आहे. नुसतीच रंगरंगोटी करण्याऐवजी ‘मुलांना अंगणवाडीत यावेस वाटावे व पालकांनाही मुलांना पाठवावेसे वाटावे’ ही थीम ठेवून अंगणवाड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी सांगितले.
वर्षभरात तालुकास्तरावर अंगणवाडीसेविकांच्या बैठका घेतल्या, अंगणवाडी कशी असावी याचे प्रशिक्षण दिले, लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकांना अवाहन करण्यात आले. वर्षभरात सुधारलेल्या अंगणवाड्या दिसत आहेत.
या संकल्पनेला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातून ८ ते ९ कोटी रुपयांचा निधी गोळा झाला आहे. याला शासनाचा कोणताही निधी नाही. लोकांनी उभ्या केलेल्या पैशातून मुलांचे युनीफॉर्म, शूज, आयकार्ड, टीव्ही, डीव्हीडी घेण्यात
आले आहेत.
लोकसहभागातून काही गावांनी शाळेच्या जुन्या भिंती पाडून निवीन भिंती बांधल्या. जमिनीवर कारपेट टाकले; त्यामुळे शाळेला चांगले रूप आले आहे. जिल्ह्यात जुन्नरमधील काचळवाडी, खेडमधील लांडेवाडी अशा काही उत्तम अंगणवाड्या तयार झाल्या आहेत. तसेच इंदापूर, पुरंदर, भोरमध्ये चांगला प्रतिसाद मिळला; मात्र बारामती, शिरूरमध्ये कमी प्रतिसाद मिळाला.
आपला पाल्य चांगल्या शाळेत शिकावा, अशी पालकांची धारणा आहे. त्यामुळे प्रत्येक जण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू लागला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जणारी ही मुले पुन्हा मराठी माध्यमाच्या अंगणवाड्यांमध्ये यावीत, यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणून जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने अंगणवाडीतील मुलांना ड्रेस, शूज, बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून दिले.

४मुलांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, बागडता यावे, खेळातून अभ्यास व्हावा, यासाठी बोलक्या अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत.
४जिल्ह्यात ४,५७० अंगणवाड्या असून, त्यांतील दोन हजार अंगणवाड्या अशा पद्धतीने झाल्या आहेत. हा उपक्रम सुरू करून एक वर्ष झाले आहे.

‘बोलक्या भिंती’
पूर्वी अंगणवाडीच्या मुलांना ड्रेस नव्हते, शाळेत बसायला बाक नव्हते. आदर्श अंगणवाडीमध्ये मुलांना युनीफॉर्म, आयकार्ड, शूज, सॉक्स, बसण्यासाठी बेबी चेअर देण्यात आल्या आहेत. आदर्श क्लासरूम होण्यासाठी ‘बोलक्या भिंती’ केल्या आहेत.
३३ प्रकल्प
३ ते ६ वयाच्या मुलांना अनौपचारिक
शिक्षण देण्यासाठी ३३ प्रकल्प तयार केले आहेत. यामध्ये मुलांना सण सांगणे, पाळीव प्राण्यांची ओळख करून देणे, फुलांची ओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये रंगरंगोटी करून घेतली आहे.
टीव्ही, डीव्हीडीचा वापर
काही शाळांमध्ये लोकसहभागातून टीव्ही व डीव्हीडी दिले आहेत. टीव्हीमध्ये गाणी-गोष्टी पाहून शिकता यावे, यासाठी त्याचा उपयोग होत आहे. ही आदर्श अंगणवाडीची संकल्पना असल्याचे

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जशा सोयीसुविधा असतात, तशा लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे चित्र बदलले आहे.
- कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या घटत्या पटसंख्येच्या पार्श्वभूमीवर या शाळांचा पाया असलेल्या अंगणवाड्याच लोकसहभागातून सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे. अंगणवाडीत मुलांना हसत-खेळत शिकता यावे, पालकांना आपले मूल इथेच शिकावे असे वाटावे या दृष्टीने महिला व बाल कल्याण विभाग पुढाकार घेत आहे.
वंदना धुमाळ, महिला व बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद

 

Web Title: Anganwadi will be joyful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.