सुपेकडे सापडले आणखी ३३ लाख; आतापर्यंत ३.९० कोटींची माया हस्तगत, घबाड संपता संपेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:15 AM2021-12-25T06:15:37+5:302021-12-25T06:17:32+5:30
सुपेच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख आणि २ कोटींचा ऐवज सापडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी, राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या घर व कार्यालतून शुक्रवारी पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले. यापूर्वी सुपेने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगेत १ कोटी ५९ लाख तसेच ४४ वेगवेगळे दागिने असा २ कोटींहून अधिकचा ऐवज जप्त केला आहे. आतापर्यंत त्याच्याकडून ३ कोटी ९० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.
सुपेच्या घरी यापूर्वी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाखांचा ऐवज सापडला. दुसऱ्यांदा टाकलेल्या छाप्यात २ कोटींचा ऐवज जप्त केला.