आधी सुनेचा छळ, आता व्याजाच्या पैशातून गोळीबार; उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:32 PM2021-07-23T17:32:27+5:302021-07-23T17:33:28+5:30

उद्योजक पिता-पुत्रासह आठ जणांविरूद्ध चतु : शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Another crime against businessman Gaikwad father and son in pune | आधी सुनेचा छळ, आता व्याजाच्या पैशातून गोळीबार; उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा 

आधी सुनेचा छळ, आता व्याजाच्या पैशातून गोळीबार; उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर आणखी एक गुन्हा 

Next

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. व्याजाने पैसे देऊन  जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून हवेत गोळीबार करत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबददल काटेनगर पिंपळे सौदागर येथील ६२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिता-पुत्रासह आठ जणांविरूद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये  दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघेही रा. औेंध) दीपक गवारे,  सोनाली दीपक गवा ((रा. डेक्कन)) राजू उर्फ अंकुश सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती) अशा आठ जणांविरुद्ध  खुनाचा प्रयत्न, महाराष्ट्र सावकारकी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली आहे.  परिसरात आरोपींची दहशत असल्यामुळे फियार्दींनी आतापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. यामधील सोनाली दीपक गवारे आणि दीपक निवृत्ती गवारे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या मुलाने आरोपी गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातून रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील जागा स्वत:चे नावावर करून घेण्यासाठी फि र्यादी व त्यांच्या मुलाला डिसेंबर २०२० मध्ये घरी बोलावले होते. त्यावेळी नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर गणेश गायकवाड व दीपक गवारे याने तरूणाच्या डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने स्टॅम्प, लिहलेले व कोरे पेपरवर सह्या घेतल्या. दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून डेक्कन येथील गवारे याच्या घरी कोंडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण करीत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
गुन्ह्यातील आरोपींनी ७ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील अतोने गावातील फिर्यादी यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर नंदा गायकवाड यांचे नाव लावल्याचे नमूद असून त्याबाबत अधिक तपास करायचा आहे. घटनेच्या दिवशी दीपक गवारे याने वापरलेले पिस्तुल जप्त करायचे आहे. 

याप्रकरणात आरोपींनी विनापरवाना तसेच बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देवून फिर्यादी यांच्याकडून नियमापेक्षा जास्त व्याज व मुद्दल वसूल केली आहे. त्यांनी या स्वरुपाचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
---------------------------------------------------------------------

Web Title: Another crime against businessman Gaikwad father and son in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.