व्यापारी व दुकानदारांची अँटिजन रॅपिड टेस्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:21+5:302021-03-25T04:10:21+5:30
श्री क्षेत्र महाळुंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या चाचण्या घेण्यात आल्या. मंगळवार, दि.२३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता ...
श्री क्षेत्र महाळुंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या चाचण्या घेण्यात आल्या. मंगळवार, दि.२३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता नागरिकांची कोरोना तपासणी चाचणीला सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज सायंकाळपर्यंत ३१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १८ जणांचा प्राथमिक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.श्री क्षेत्र महाळुंगे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व दुकानदार, व्यापारी, भाजी मंडईमधील भाजीवाले, फेरीवाले तसेच नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महाळुंगे ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी व ग्राम विकास अधिकारी सोमनाथ पारासुर उपस्थित होते.
महाळुंगे येथील आरोग्य उपकेंद्रातील सेवकांनी व कर्मचाऱ्यांनी या तपासणी करण्यासाठी परिश्रम घेतले.
महाळुंगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेडर अँटिजन रॅपिड टेस्ट करण्यात आली.