Video: जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:06 PM2021-12-07T13:06:53+5:302021-12-07T13:07:02+5:30
दरम्यान जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावरील 14 नंबर येथे 24 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेवर पडलेल्या दरोड्यानंतर बुधवारी रात्री दुसरी घटना घडल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.
आळेफाटा : आळेफाटा परिसरातील असलेल्या साई इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावर सहा दरोडेखोरांनी सशस्त्राचा धाक धाकवून दरोडा टाकला आहे. सोळा हजार रूपये रोख व मोबाईल असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावरील 14 नंबर येथे 24 नोव्हेंबर रोजी पतसंस्थेवर पडलेल्या दरोड्यानंतर बुधवारी रात्री दुसरी घटना घडल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर आळेफाटा परिसरातील चिंचकाईमळा येथे अविनाश पटाडे यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरूस्तीचे साई इलेक्ट्रॉनिक्स असे दुकान आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विरूध्द बाजूने दोन दुचाकीवरून रुमालाने व मास्कने तोंड बांधलेले अंदाजे पंचवीस ते तीस वयाचे सहा जण तेथे आले. त्यातील एक जण बाहेर थांबला व पाच जण दुकानात जात एम्लीफायर दुरुस्तीचा बहाणा केला. त्यावेळी बाहेर थांबलेल्या एकाने दुकानाचे शटर खाली ओढून घेतले. व आतील पाच जणापैकी एकाने पिस्तुल काढत त्याचा धाक दाखवून दमदाटी करून तुझ्याकडे काय आहे ते दे. असे म्हणत पटाडे यांच्याकडील रोख, रक्कम घेऊन दुचाकीवरून चावी पळ काढला.
जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. #Pune#junnarpic.twitter.com/wLR7Iy93yI
— Lokmat (@lokmat) December 7, 2021
या घटनेनंतर आळेफाटा परिसरात व्यापारीवर्गात खळबळ उडाली. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेटी देत तपासाला सुरुवात केली. तसेच दरोड्याची ही घटना दुकानातले सिसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अविनाश पटाडे यांचे फिर्यादीवरुन आळेफाटा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या दरोड्याचा तातडीने तपास करण्याची मागणी आळे सरपंच प्रितम काळे उपसरपंच अँड विजय कु-हाडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.