Arogya Bharati : 'टोपे साहेब, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवले, हेच का तुमचे नियोजन'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 09:16 PM2021-10-24T21:16:56+5:302021-10-24T21:18:06+5:30

Arogya Bharati : राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही.

Arogya Bharati : Rajesh tope sir, put two students on one bench, why is this your planning for health exam | Arogya Bharati : 'टोपे साहेब, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवले, हेच का तुमचे नियोजन'

Arogya Bharati : 'टोपे साहेब, एका बेंचवर दोन विद्यार्थी बसवले, हेच का तुमचे नियोजन'

googlenewsNext
ठळक मुद्देआज समितीच्या ट्विटर हँडलवरुन आरोग्य भरतीसंदर्भातील अनेक चुका स्पष्टपणे दाखवून देण्यात आल्या आहेत. 

राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या परीक्षेची ढकलगाडी करून ठेवली होती. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या केंद्रावरूनही गोंधळ निर्माण झाला होता. अखेर राज्य शासनाने २४ ऑक्टोबरला परीक्षा होणार असे जाहीर केले. आज संपूर्ण राज्यासहित पुण्यातही आरोग्य विभागाची परीक्षाही घेण्यात आली. मात्र, या परीक्षेतील गोंधळावरुन उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर, सोशल मीडियातून आपला अनुभवही कथन केलाय. 

राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर नियोजनशून्य कारभारा पाहायला मिळाला. त्यामुळे, परीक्षार्थींनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीटचा नंबर मिळाला नाही. सकाळी १० वाजून गेले तरी विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था उपलब्ध नव्हती. परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसणे, पेपर उशीरा सुरू होणे, चूकीची प्रश्नपत्रिका देणे, अशा अनेक समस्यांचा सामना रविवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना करावा लागला. तर, काही परीक्षा केंद्रावर एकाच बँचवर दोन उमेदवारांना बसविण्यात आले होते. MPSC महाराष्ट्र समन्वय समितीने याचे फोटोही ट्विटरवरुन शेअर केले आहेत.   


स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या परिक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या संदर्भात राज्यव्यापी चळवळ चालविण्याच्या हेतुने ही समिती ऑनलाईन स्थापन करण्यात आली आहे. आज समितीच्या ट्विटर हँडलवरुन आरोग्य भरतीसंदर्भातील अनेक चुका स्पष्टपणे दाखवून देण्यात आल्या आहेत. 

परीक्षा केंद्रांवर सावळा गोंधळ

एकदा नियोजित परीक्षा रद्द करूनही दुसऱ्यांदा परीक्षांच्या नियोजनात सावळा गोंधळ झाल्याचे दिसून आले. त्यावेळी विदयार्थ्यांनी केंद्र प्रमुखांना बोलावण्याची मागणी विद्यार्थांनी केली. यावेळी केंद्र प्रमुखांनी हॉल तिकीट आणि आसनव्यवस्था दोन्ही अडथळे दूर केल्याशिवाय विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत असे जाहीर केले. उशिरा पेपर सुरु झाल्यावरही विद्यार्थांना वेळ वाढवून दिली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण 

विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातील विद्यार्थी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरात परीक्षेसाठी येत असतात. आधीच दोन, तीन वेळा केंद्रांवरून गोंधळ निर्माण झाला होता. आता पुन्हा आसनव्यवस्था आणि हॉल तिकीटयावरून गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.  

यापूर्वी परीक्षाच रद्द झाली होती

राज्याच्या आरोग्य विभागात ६५०० पेक्षा जास्त गट-क आणि गट-ड पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा आयोजित केली होती. आरोग्य विभागाने २४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान एक पत्रक प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याचे जाहीर केले. परीक्षेला अवघे १०-१२ तास शिल्लक असताना आपण परीक्षा रद्द करण्याचा तुघलकी निर्णय जाहीर केल्या आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आरोग्य विभागाच्या आणि राज्याचे आरोग्य मंत्रीराजेश टोपे यांच्या निर्णयांचा भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका गरीब उमेदवारांना बसला होता. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. 

Web Title: Arogya Bharati : Rajesh tope sir, put two students on one bench, why is this your planning for health exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.