शिक्रापूर: दरोडयातील एका अटक आरोपीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला शिक्रापूरपोलिसांनी कोंढापुरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले होते. येथे आरोपीने सात दिवस उपचार घेतले. शेवटी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोविड सेंटरमधून पलायन केलेल्या या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत एका शेतात लपलेला असताना ड्रोनच्या साहाय्याने लोकेट करत अटक केली.
या बाबतची रंजक माहिती अशी, एका दरोडा प्रकरणात सौऱ्या उर्फ सौरभ ड्रायवहऱ्या भोसले ( वय २१, रा. वैदवाडी तळेगाव ढमढेरे) याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या नंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पोलिसांनी त्याची रवानगी कोंढापुरी कोविड सेंटरला केली. सात दिवस उपचार घेतल्या नंतर आरोपीने संधी साधत दि 20 रोजी दुपाराच्या वेळेस तेथे ड्युटीवर असलेले पोलीस नाईक लखन शिरसकर व शुभम निर्मलम यांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. दरोडयातील आरोपी फरार झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस फौजफाटा शोध मोहिमेसाठी रवाना झाला.परिसरातील गावातील ग्रामसुरक्षा रक्षक दले ग्रामस्थ पोलीस पाटील यांना सक्रिय करण्यात आले. आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना अखेर आरोपी तळेगाव ढमढेरे येथील एका उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली.
शिक्रापूर पोलिसांनी ड्रोन कॅमेरा मागवून ड्रोनच्या सहाय्याने आरोपी शेतातच लपल्याची पक्की खात्री केली आरोपीच्या नातेवाईकना बोलावून आरोपीला बाहेर येण्याचे आवाहान केले त्याला देखील आरोपिने दाद दिली नाही. अखेर पोलिसांनी स्पीकरवर आरोपीला सूचना केली की तुला काहीही त्रास पोलीस देणार नाही.