वसंताचे आगमन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:43+5:302021-02-16T04:11:43+5:30

वसंत पंचमीला विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तसेच खाण्यातही पिवळे पदार्थ ...

The arrival of spring ... | वसंताचे आगमन...

वसंताचे आगमन...

googlenewsNext

वसंत पंचमीला विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तसेच खाण्यातही पिवळे पदार्थ बनवले जातात.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंतऋतूमध्ये लोभस वाटतो. वसंतामध्ये निसर्गात वेगवेगळे बदल होऊ लागतात. शिशिर ऋतूमध्ये वृक्षाची पाने गळून जातात व वसंतामध्ये वृक्षांना पुन्हा नवी पालवी फुटते. या ऋतूत झाडांना नवीन फुले, मोहोर येत असल्यामुळे फुलपाखरे, पक्षी, मधमाश्या यांची रेलचेल झाडांवर दिसते.

भारतात वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळ्या पध्दतीने वसंत पंचमी साजरी केली जाते. सध्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये निसर्गातील बदल पाहायला मिळत आहे. काटेसावर, पांगारा, अंजन, करपा, पळस, घाणेरी, चाफा, करवंद अशा वेगवेगळ्या झाडांना सुंदर सुंदर फुले आली आहेत. या झाडांवर सतत पक्षांची किलबिल सुरू असते, मधमाश्या घोंगावत असतात. या फुलांमुळे सध्या निसर्ग अतिशय लोभस व आकर्षक वाटत आहे.

१५ घोड02 - वसंताच्या आगमनाला पळसाच्या झाडांना आलेली फुले

१५ घोड03 - वसंताच्या आगमनाला पळसाच्या झाडांना आलेली फुले

१५ घोड04 - काटेसावरीच्या झाडाला लागलेली पूर्ण फुले

१५ घोड05 - काटेसावरीच्या झाडांना लागलेली टपोरी लालभडक फुले

१५ घोड06 - पांगारा

१५ घोड07 - करप

१५ घोड08 - आंब्याच्या झाडांना लागलेली कनी

Web Title: The arrival of spring ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.