Pune | सिरम कंपनीने पूर्वकल्पना न देता बंद केला रस्ता; संतप्त ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:30 AM2023-04-26T09:30:29+5:302023-04-26T09:32:08+5:30

अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने नागरिक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली अन् रस्ता खुला करण्यात आला...

As the serum company closed the road without prior notice, the villagers got angry and staged a protest | Pune | सिरम कंपनीने पूर्वकल्पना न देता बंद केला रस्ता; संतप्त ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Pune | सिरम कंपनीने पूर्वकल्पना न देता बंद केला रस्ता; संतप्त ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

googlenewsNext

हडपसर : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने साडेसतरानळी मांजरी शिवेचा ब्रिटिशकालीन रस्ता पूर्वकल्पना न देता बंद केल्याने संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने नागरिक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली अन् रस्ता खुला करण्यात आला.

आमदार चेतन तुपे, माजी उपसभापती संदीप तुपे, माजी उपसरपंच रुपेश तुपे, भूषण तुपे, माजी उपसरपंच नितीन तुपे, महेश तुपे, संतोष तुपे, प्रदीप गोगावले, दीपक देवकर, सुभाष अडसूळ, बाळासाहेब तोडमल, सनी तोडमल, कृष्णा भोसले यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले तसेच सिरम कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने कंपनीच्या व्यवस्थापनाने रस्ता खुला केला.

सिरम कंपनीने अचानक न सांगता आज सेवेचा रस्ता बंद केल्याने साडेसतरानळी भागातील ग्रामस्थ संतप्त झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. नागरिकांच्या संतप्त भावना पाहून कंपनीने हतबल होऊन रस्ता खुला केला. आदर पुनावाला यांच्या सोबत बैठक झाली आहे. या विषयावर चर्चा झाल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले. यासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Web Title: As the serum company closed the road without prior notice, the villagers got angry and staged a protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.