‘आषाढस्यं प्रथमदिवसे’ यंदा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:16+5:302021-07-15T04:08:16+5:30
‘सूर नवा, ध्यास नवा’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेच्या सहायक लेखिका प्रा. पूनम छत्रे यांच्या विचार पुष्पांनी हा कार्यक्रम संपन्न ...
‘सूर नवा, ध्यास नवा’ या कलर्स वाहिनीवरील मालिकेच्या सहायक लेखिका प्रा. पूनम छत्रे यांच्या विचार पुष्पांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब खाडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्या दिल्या. द रवर्षी पुरंदरे वाड्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक साहित्यप्रेमींची हजेरी लागत होती.
प्रा. पूनम छत्रे यांनी लेखन केलेल्या व गेली तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ याच्या स्क्रिप्ट लेखनाचा प्रवास, त्यातील अनुभव त्याचे सेलिब्रेटी गायक, छोटे सूर वीर, स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे आणि सध्या सुरू असलेल्या १५ ते ३० वयोगटातील मुलींसाठी आशा उद्याची या चार भागांचे सुंदर विवेचन केले. गायकाचे स्टुडिओतील रेकॉर्डिंग व प्रत्यक्ष दूरदर्शनवरील आवाज याविषयी देखील छत्रे यांनी भाष्य केले. गीता पुरंदरे यांनी सूत्रसंचलन, तर नानासाहेब यांच्या कन्या वर्षा बाळगोपालन यांनी प्रास्तविक केले. कौशिक पुरंदरे यांनी स्वागत, तर प्रतिभा पुरंदरे यांनी आभार व्यक्त केले.