मास्क का लावला नाही विचारले असता पोलिसांना धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:19 AM2021-03-13T04:19:54+5:302021-03-13T04:19:54+5:30
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धनश्री चौकात पोलीस हवालदार भाऊ कोरके, मल्हारी करचे, बबन भवारी, पोलिस नाईक ...
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धनश्री चौकात पोलीस हवालदार भाऊ कोरके, मल्हारी करचे, बबन भवारी, पोलिस नाईक
पावडे हे दि. १० रोजी दुपारी साडेचार वाजता वाहतूककोंडी सुरळीत करत होते. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्क लावण्याच्या सूचना करून विनामास्क वाहनचालकांकडून दंड वसूल करत होते. दरम्यान रविराज तांबे, योगेश पोखरकर हे विनामास्क दुचाकीवरून चालले होते. पोलिसांनी गाडी बाजूला घ्या असे सांगून दुचाकीचालक तांबे याने रस्त्याच्या मध्येच गाडी उभी करून पोलिस नाईक पावडे यांना तुला काय माझी गाडी अडवायचा अधिकार असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच विनामास्कची पावती फाडा, अशी इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी विनंती केली असता, मला तुमच्याबरोबर बोलायचे नाही, मी पावती फाडणार नाही, असे तांबे याने उलट उत्तर दिले. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, काय करायचे ते करा, असे म्हणून पोखरकर व तांबे या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. या घटनेबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या दोघांना १४ दिवसांची कोठडी मिळाली आहे.