ज्योतिषाने सांगितले ‘आपली फ्रेंडशिप होऊ शकते’ आणि मग पुढे जे काही घडलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 03:24 PM2020-03-13T15:24:45+5:302020-03-13T15:26:41+5:30

लग्न, प्रेम, नोकरी यांसारख्या बाबतीत तर हमखास ज्योतिषाचा सल्ला घेण्यात येतो.

Astrologers say ' friendship will be develop with you and after can happen | ज्योतिषाने सांगितले ‘आपली फ्रेंडशिप होऊ शकते’ आणि मग पुढे जे काही घडलं....

ज्योतिषाने सांगितले ‘आपली फ्रेंडशिप होऊ शकते’ आणि मग पुढे जे काही घडलं....

Next

पुणे : आपल्या आजूबाजूला ज्योतिषावर श्रध्दा असणारी बरीच माणसे पाहायला मिळतात. ते दिवसाची सुरुवात करण्यापासून ते अनेक महत्वाची कामे सुध्दा रोजचे राशीभविष्य आणि चांगला मुहूर्त बघून करतात. लग्न, प्रेम, नोकरी यांसारख्या बाबतीत तर हमखास ज्योतिषाचा सल्ला घेण्यात येतो. एका ज्येष्ठ नागरिकाने ज्योतिष सल्ल्याचा फंडा वापरत ऑफिसमधील महिलेचे ‘प्रेम ’मिळविण्याचा प्रयत्न केला. पण  हा फंडा त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

झाला प्रकार असा की, एकाच कार्यालयात काम करणाऱ्या एका वयस्कर माणसाने महिलेला आपली फ्रेंडशिप होऊ शकते. असे ज्योतिषाने सांगत एका महिलेला सांगून ज्येष्ठ नागरिकाने महिलेला सांगून तिचा विनयभंग केला आहे. ज्येष्ठ  नागरिकाच्या अशाप्रकारच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.त्यानुसार पोलिसांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे.    
फिर्यादी व आरोपी ज्येष्ठ नागरिक (वय 62) या एकाच कार्यालयात काम करतात. संबंधित आरोपी शिपायाचे काम करत असल्याने तो फिर्यादी महिलेच्या परिचयाचा आहे. त्याने फिर्यादी महिलेचा हात जबरदस्तीने ओढून हाताचे चुंबन घेतले. यानंतर मी ज्योतिषाला विचारले असून आपली फ्रेंडशिप होऊ शकते, यामुळे आपण हॉटेलमध्ये व पिक्चरला जाऊ असे म्हणत चुकीचे वर्तन केले. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. दाखल झालेल्या फियार्दीनूसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत करत आहेत. 

Web Title: Astrologers say ' friendship will be develop with you and after can happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.