या मारहाणीत नितीन बापू गायकवाड (वय ३४, रा. रेल्वेलाईन शेजारी, सिध्दार्थनगर, कवडी माळवाडी, कदमवाकवस्ती, हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी उज्ज्वला (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश दगडू आढाळे (वय २८) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: नितीन गायकवाड हे प्लंबिगचे काम करतात. ते राहत असलेल्या सिध्दार्थ नगर येथे अक्षय आढाळे हा राहण्यास असून तो गायकवाड यांच्याकडे येता-जाता रागाने बघून डिवचत असतो.
मंगळवार (१३ जुलै) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गायकवाड हे पत्नीसमवेत दुचाकीवरून भाजी आणण्यासाठी निघाले त्यावेळी आमच्या घराजवळील चौकात अक्षय अढाळे हा उभा होता. त्याने गायकवाड यांच्याकडे रागाने पाहिल्याने गाडी थांबवून त्यास जाब विचारला. वाद नको म्हणून पती-पत्नी तेथून निघून गेले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते परत आले तेव्हा चौकामध्ये आढाळे उभा होता. गायकवाड हे त्यांचे बहिणीचे घरी गेले.
७ - ३० वाजण्याच्या सुमारास पतीचा मोठ्यामोठ्याने आवाज येत असल्याने उज्ज्वला व सासू प्रभा घराबाहेर आल्या असता आढाळे हा कुऱ्हाडीने गायकवाड यांच्या डोक्यात मारत होता. तेव्हा उज्ज्वला पळत गेल्या असता त्यज्च्याही अंगावर कुऱ्हाड उगारून त्यांच्या पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने जोरात मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. केलेल्या वारामुळे
डोक्यातून रक्त येऊ लागले. तेव्हा तेथे लोकांची गर्दी जमा झाली. त्यावेळी अक्षय यांने त्यांचे हातातील कुऱ्हाड हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण केली. तेथे असणारे इतर लोक सैरावैरा पळून गेले. तेथील परिसरातील लोकांनी त्यांचे घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या. गायकवाड खाली पडले त्यांचे डोक्यातून रक्त येऊ लागलेले पाहून अक्षय हा रेल्वे पटरीने अंधारात कुऱ्हाडीसह निघून गेला. त्यानंतर गायकवाड यांना कदमवाकवस्ती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.