दोन बॅकांचे एटीएम उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:29+5:302021-03-21T04:10:29+5:30

याप्रकरणी एफ. आय. एस. पेमेंट सोल्युशन चे एटीएम. ऑफिसर विकास जालिंदर भगत यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा ...

Attempt to steal ATMs of two banks | दोन बॅकांचे एटीएम उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न

दोन बॅकांचे एटीएम उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न

Next

याप्रकरणी एफ. आय. एस. पेमेंट सोल्युशन चे एटीएम. ऑफिसर विकास जालिंदर भगत यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ( १९ मार्च ) रोजी सकाळी ८ - ३०वाजण्याच्या सुमारास सुमारास बॅक ऑफ इंडीया शाखा उरुळी कांचनचे मॅनेजर सचिन सदानंद शिंदे यांनी भगत यांना फोन करून बॅकेच्या एटीएम. मशीनचे उघडे दरवाजाचे वाटे आतमध्ये प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने पैसे चोरण्याचे उद्देशाने चोरी करण्याचा प्रयत्न

केला आहे. असे सांगीतले.

भगत तेथे आले व पाहणी केली असता त्यांना एटीएम मशीनची गॅस कटरचे साहाय्याने तोडफोड करून सीसीटीव्ही फुटेजच्या डीव्हीआर मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना अशाच प्रकारे ऊरूळी कांचन मधील सोनाई हॉटेलचे शेजारी पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेले एचडीएफसी बॅकेचे एटीएम मध्ये अशाच प्रकारे तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले म्हणुन त्यांनी अज्ञात चोरटयांचे विरोधात तक्रार दिली आहे.

Web Title: Attempt to steal ATMs of two banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.