पुणे : शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने यंदा देखील तीन चाकी रिक्षांना सीएनजी कीट बसविण्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी येत्या १५ सप्टेंबरपासून अर्ज स्विकारण्यात येणार आहे. अॅटो रिक्षांना सीएनजी कीट बसविण्यासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. ज्या रिक्षांना सीएनजी कीट बसविलेले आहे व सन २०१४ पूर्वी आरटीओ रजिस्ट्रेशन केले आहे, अशा परिमट धारकांना अनुदानासाठी महापालिकेकडे अर्ज करता येणार आहे. येत्या १५ सप्टेंबर पासून आॅन लाईन पदध्तीने अर्ज स्विकारणार आहेत. शहरातील पात्र अॅटो रिक्षांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान देण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
शहरातील अॅटो रिक्षांना सीएनजी कीटसाठी अनुदान मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 9:38 PM