गणशोत्सवात गर्दी टाळ, रक्तदान शिबिर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:15 AM2021-09-05T04:15:32+5:302021-09-05T04:15:32+5:30
राजगुरुनगर: खेड तालुक्यात कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक ...
राजगुरुनगर: खेड तालुक्यात कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे एक गाव-एक गणपती उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर कोरोनाचे नियम पाळून राबवावेत असे आवाहन खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सतीश गुरुव यांनी केले आहे.
खेड पोलीस ठाणे व पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्ष यांची बैठक सिध्देश्वर मंगल कार्यालयात घेण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव बोलत होते. या वेळी राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, शिवसेना महिला अघाडीच्या विजया शिंदे, दक्षता कमिटीचे अध्यक्षा मनीषा टाकळकर, गोपनीय विभागाचे संदीप भापकर, अर्जुन गोडसे, अमर टाटीया यांच्यासह सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.
कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावरही आता काही निर्बंध आले आहेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. तालुक्यात व राजगुरुनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, गणेशोत्सव काळात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. शासनाने सूचित केलेल्या निर्देशांचे पालन करून, मूर्तीची उंची, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे. डीजे वाजवू नये, वर्गणीची सक्ती करु नये, एक गाव गणपती उपक्रम राबवावेत, कोरोनाचे नियम पाळून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर राबवावीत विसर्जन मिरवणुकीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्द यांना येण्यास परवानगी देऊ नये असे आवाहन करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करावी व नागरिकांना आव्हान करावे, शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून करावे.