पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाअंतर्गत शेतक-यांनी खंडेरायाला जागरण गोंधळ घातला. निद्रीस्त शासनाला जाग यावी, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलनाच्या आठव्या दिवशी आंदोलकांनी येथील विठ्ठल मंदिरात साखळी उपोषण कायम ठेवले.संतप्त ग्रामस्थ सकाळी गावात एकत्रीत आले. यावेळी शासनाच्या निषेर्धात घोषणा देण्यात येत होत्या. गावातून संबळ आणि इतर वाद्य वाजवत आंदोलकांनी फेरी काढली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावात विठ्ठल मंदिराजवळ आंदोलकांनी जागरण गोंधळ घालून परडी भरली. शासनाला सुबुद्धी येऊ दे!, शेतकºयाची इडापीडा टळू दे! अशा घोषणा देण्यात आल्या.कानगाव येथे आंदोलकांच्या भेटीसाठी दुरवरून शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते येत आहेत. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. दौंड तालुक्यातील गिरीम, शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या दोन्ही गावातील ग्रामस्थ शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते.कानगावात शासन येऊ द्याकानगावच्या ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन हे फक्त कानगावच्या शेतकºयांसाठी नाहीतर हे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी आहे. तेव्हा राज्यभरातील शेतकºयांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊठाव केला पाहिजे. शेकºयांच्या मागण्या रास्त आहेत, त्यासाठी शासन कानगावात आल पाहिजे. परंतु, ज्यांच्या हातात काही नाही, असे अधिकारी आंदोलनस्थळी पाठवले जातात. अधिकारी येतात तर पदाधिकारी नसतात आणि पदाधिकारी आले तर अधिकारी नसतात. यात आश्वासनाची टोलवाटोलवी केली जाते, आंदोलक भरडला जातो. तेव्हा निर्णय क्षमता असणारे अधिकारी आणि पदाधिकारी आंदोलनस्थळी आले तर शेतकºयांची कुचेष्टा होणार नाही - हर्षवर्धन पाटील, (माजी मंत्री)
कानगावला शेतक-यांचा जागरण गोंधळ, राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा आठवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:01 AM