परीट सेवा मंडळाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:15 AM2021-02-26T04:15:34+5:302021-02-26T04:15:34+5:30
पुणे : क्षत्रिय मराठा परीट सेवा मंडळ व परीट सेवा मंडळ, पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे परीट समाजभूषण ...
पुणे : क्षत्रिय मराठा परीट सेवा मंडळ व परीट सेवा मंडळ, पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे परीट समाजभूषण व अष्टपैलू पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा समाजभूषण पुरस्कार नंदकुमार कदम, अशोक भागवत यांना, तर अष्टपैलू पुरस्कार कृष्णा खंडाळे व सुधाकर यादव यांना प्रदान करण्यात आला. या वेळी कसबा पेठेतील संत गाडगेमहाराज सांस्कृतिक भवन वास्तूच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वास्तू उभारणीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला.
या वेळी पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, उद्योजक रमाकांत कदम, दिव्यांग कल्याणकारी विभाग महाराष्ट्र सरकारचे उपायुक्त संजय कदम, परीट सेवा मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार व कवयित्री अमृता खाकुर्डीकर, क्षत्रिय मराठा परीट तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संत गाडगेमहाराज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी योगदान देणारे सुरेश नाशिककर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत शिंदे, नाना आदमाने, शिवाजी पवार, बबन पवार, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब भोसले, छाया ठाणेकर, पुष्पा भोसले यांचा सन्मान करण्यात आला. कै. मोहन जाधव यांचा सन्मान हेमा जाधव यांनी स्वीकारला, तर कै. सूर्यकांत शिंदे यांचा सन्मान समीर शिंदे यांनी स्वीकारला.