अस्ताव्यस्त सायकलींचा पादचारी नागरिकांना त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 03:02 AM2018-10-28T03:02:16+5:302018-10-28T03:02:45+5:30
सायकल स्टॅण्ड नसल्याने चांगल्या योजनेला लागले ग्रहण
पाषाण : स्मार्ट सिटी एरियामध्ये सायकल शेअरिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे परंतु सर्वत्र सायकली अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याने या सायकलींचा पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी सायकली वापराव्यात म्हणून बाणेर बालेवाडी परिसरातील चौकांमध्ये सायकली ठेवण्यात येतात .
या सायकली वापरानंतर या सायकली ठेवायचा कुठे हा प्रश्न असल्याने रस्त्यावरच सायकली सोडण्यात येतात . अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी फूटपाथच्या मध्यभागी या सायकली उभ्या करण्यात येत असल्याने याचा वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होतो.
सायकली देण्यात आल्या पण सायकली ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध नाही यामुळे अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तर अनेकदा फूटपाथवर पडलेल्या सायकली उचलल्या जात नाहीत तसेच आडबाजूच्या रस्त्यांवरील सायकली बराच काळ तशाच असतात यामुळे आवश्यक ठिकाणी सायकलींचा वापर होतोच असे चित्र पाहायला मिळत नाही.
सुट्या भागांची होते चोरी
अनेक ठिकाणी सायकलींचे स्पेअर पार्ट चोरीला गेलेले पाहायला मिळतात तर काही ठिकाणी कचऱ्याच्यामध्ये अनेक सायकली पाहायला मिळतात.
बाणेर बालेवाडी परिसरामध्ये सायकली वापरानंतर त्या सायकली योग्य जागी ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सायकलींचे मार्ग उपलब्ध करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत .