उरुळी कांचन : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्यातून (जुन्या) वाहणारे घाण पाणी जलपर्णीमुळे अडले आहे. हे पाणी पाझरून आजूबाजूच्या शेतात साचत असल्यामुळे कालवा परिसरातील शेती संकटात सापडली आहे. पाण्याचा दबाब वाढल्यास हा कालवा फूटून पुण्यात दांडेकर पुलाजवळ नवा कालवा फुटल्याने जो जलप्रलय झाला तसाच प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केले आहे.आघाडी सरकारच्या काळात पुण्याचे सांडपाणी शुद्ध करून जुन्या कालव्याच्या माध्यमातून हवेली व दौंड या तालुक्यांच्या शेतीसाठी वापरण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करूनही त्यावरील छोटे पूल अन्य काही कामे न झाल्याने एवढा मोठा खर्च करूनही या कालव्यातून पाणी शेतीपर्यंत पोहोचले नाही.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यावर त्यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व पुलांऐवजी पाईप टाकून पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. तसेच, या कालव्यातून पाणी सोडण्यात आले; पण हा कालवा बरीच वर्षे बंद असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तीन वर्षांपूर्वी जुन्या मुळा-मुठा (बेबी कालव्याची) कालव्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर व मुंढवा जॅकवेलमधून चार पंपाच्या साह्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. सध्या जॅकवेलमधील पंपांची संख्या वाढविल्याने त्यतून वाहणाºया पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि जलपर्णीच्या अडथळ्याने दिवसेंदिवस कालव्याच्या परिसरात पाणीगळती वाढत आहे. सातत्याने होणाºया गळतीमुळे शेतकºयांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. तर, कालव्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी पाझरत आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असल्याने पाण्याचा दबाव वाढून कालवा फुटण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याआधी या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.जुन्या (बेबी) कालव्यातून घाण पाणी पाझरून उरुळी कांचन गावाच्या शेतकºयांच्या शेतात साठल्याने उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. कालव्याच्या शेजारी फूलशेती आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतात साठत असल्याने शेतकºयांना गुलाबाची फुले तोडून बाजारात नेणे अवघड झाले आहे. या गळतीमुळे कालव्याच्या परिसरातील शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याबाबत मुठा कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आर. बी. व्यवहारे म्हणालेसंबंधित कालवादुरुस्तीचे काम हे काम उपविभागाकडे येत नाही. हे काम यवत उपविभागाकडे आहे.यवत उपविभागाचे उपअभियंता बनकर म्हणाले, की ही बाब खरी असून लवकरच जेसीबी मशीनच्या साह्याने जलपर्णी काढून पाण्याचा अडथळा दूर करण्यात येईल.