सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:42+5:302021-01-02T04:09:42+5:30

पुणे : गाडीतून ऑईल लिकेज झाल्याचे सांगून मदत करण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकांच्या गाडीतील बॅग लंपास केली. ...

The bag of goldsmiths lamps all day long | सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास

सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास

Next

पुणे : गाडीतून ऑईल लिकेज झाल्याचे सांगून मदत करण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकांच्या गाडीतील बॅग लंपास केली. बॅगमध्ये ८०० ग्रॅम सोने व २ किलो चांदी असा ऐवज होता.

सराफ व्यवसायिक करण माळी (रा. देहुरोड) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील आर. सी. एम. गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी यांचे देहुरोड येथे सोन्याचे दुकान आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते माल खरेदीसाठी रविवार पेठेते आले होते. ते परत जात असताना चोरट्यांनी माळी यांना त्यांच्या गाडीतून ऑईल लिकेज होत असल्याची बतावणी केली. माळी हे कारमधून खाली उतरुन त्यांनी बोनेट उघडून ऑईल कोठून गळत आहे, हे पाहू लागले. ही संधी साधून चोरट्यांनी सोने व चांदी ठेवलेली बॅग चोरुन ते पळून गेले. काही वेळातच चोरट्यांनी आपल्याला फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेतली. चोरीचा हा प्रकार समजताच फरासखाना पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

Web Title: The bag of goldsmiths lamps all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.