अलंकापुरीत रस्त्यांचा कोंडला श्वास

By admin | Published: May 11, 2017 04:19 AM2017-05-11T04:19:34+5:302017-05-11T04:19:34+5:30

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत बेकायदेशीरपणे होत असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्यांचा श्वास कोंडला जात आहे. वडगाव रस्ता, चाकण

Bamboo of road roads in the house | अलंकापुरीत रस्त्यांचा कोंडला श्वास

अलंकापुरीत रस्त्यांचा कोंडला श्वास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत बेकायदेशीरपणे होत असलेल्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे रस्त्यांचा श्वास कोंडला जात आहे. वडगाव रस्ता, चाकण रस्ता तसेच माउली मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पार्किंगमुळे या परिसराला वाहनतळाचे रूप प्राप्त होऊ लागले आहे. परिणामी भाविकांना पायी चालतानासुद्धा नाहक त्रास सहन करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. बेकायदेशीररीत्या फोफावत चाललेल्या पार्किंगवर पोलीस प्रशासनाकडून कायमस्वरूपी कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक तसेच भाविकांकडून विचारला जात आहे.
प्रदक्षिणामार्गावरून मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर महाद्वारात प्रवेशाच्याच वेळी भाविकांना येथील बेशिस्त पार्किंगचा सामना करावा लागत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रवेशमार्गावरच सुमारे शंभराहून अधिक दुचाकी वाहने बेकायदेशीररीत्या पार्किंग केली जात असल्याने भाविकांना चालताना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, मंदिरात प्रवेश करायचा कसा? असा प्रथमदर्शनी प्रश्न भाविकांना पडू लागला आहे.
मंदिराबाहेरील मोकळ्या परिसरात ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला असतानाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे मंदिराचा श्वास कोंडला जाऊन परिसरात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. त्यातच दुकानदार, प्रसादविक्रेते, फेरीवाले आदींचे अतिक्रमण अधिक भर घालत आहे. त्यामुळे शेजारील रस्त्यावरून पायी ये-जा करतानाही अडचण होत आहे. बेकादेशीरपणे ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये वाहने लावलेल्या महाशयांवर पोलिसांनी नित्याने कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आळंदी विकास युवा मंचच्या वतीने संदीप नाईकरे, संजय नाईकवडी, रूपाली पानसरे, अमोल घुंडरे, गौरी भापकर, पुष्पा कुऱ्हाडे, प्रदीप गायकवाड आदींनी केली जात आहे.

Web Title: Bamboo of road roads in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.