पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:06 PM2021-03-24T15:06:14+5:302021-03-24T15:15:11+5:30

गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा, हॉटेल ,खाजगी तसेच सार्वजनिक मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी तसेच रंगपंचमी साजरी करता येणार नाही.  आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई

Ban on Holi celebrations in Pune district | पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

पुण्यात होळी अन् धुळवडीवर बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

Next

पुणे : पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता शहरातही होळी आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. 

पुणे जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशानाकडून काही पावल उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण साजरे करायला बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. 

या आदेशानुसार  कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, मैदाने ,शाळा, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च २०२१ रोजी साजरा होणारा धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे आवश्यक ती मानद कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर मनाई आदेशाचे पालन करुन नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच सदर आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

 

Read in English

Web Title: Ban on Holi celebrations in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.