पुणे: मंडईच्या शारदा गणेशासमोर बँड वादन करणारे, हजारो युवकांना वादनाची दीक्षा देणारे प्रभात बँडचे संचालक श्रीपाद सोलापूरकर यांना यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने सोलापूरकर यांच्या अविरत वादनसेवेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, ठाकूर परिवार यांच्या वतीने ज्येष्ठ शाहीर व शिक्षक शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
अप्पा बळवंत चौकातील प्रभात बँडच्या कार्यालयासमोर प्रभात बँडच्या कार्यालयासमोर रांगोळी, तोरण लावून सनई-चौघडयांच्या गजरात सोलापूरकर यांना सन्मानित करण्यात आले.
शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णा थोरात, आनंद सराफ, पराग ठाकूर, जगदीश शेटे, शिरीष मोहिते, अमर लांडे, शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सुरेश तरलगट्टी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण देताना कधीही कसलाही मोबदला घेतला नाही, पुर्वजांच्या पुण्याईनेच हा सन्मान मिळाला असे सोलापूरकर यांनी सांगितले. थोरात,
शाहीर मावळे, ठाकूर यांचीही भाषणे झाली.