बाणेरला मे महिन्यात कोविड हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:04+5:302021-04-28T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या उभारणीच्या कामाला पुणे महापालिकेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या उभारणीच्या कामाला पुणे महापालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. मे महिन्याच्या मध्यात हे २१२ बेडचे हॉस्पिटल कार्यान्वित होईल असा प्रयत्न महापालिका प्रशासनाचा आहे.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या हॉस्पिटलची पाहणी केली. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना, अनेकांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड लागत आहे. त्यामुळे बाणेर येथे नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. १५० ऑक्सिजन बेड तर ६२ आयसीयू बेड ची व्यवस्था येथे करण्यात येत आहे. येथे हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणे, वैद्यकीय साहित्य मागविणे आदींची जलद गतीने कामे सुरू करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता अमर शिंदे, गंगाप्रसाद दंडिमे आदी उपस्थित होते .
------
फोटो मेल केला आहे