बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससून रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 10:31 AM2018-06-21T10:31:19+5:302018-06-21T10:31:19+5:30

डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बुधवारी (20 जून) अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bank of Maharashtra President Ravindra Marathe admitted to Sassoon Hospital | बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससून रुग्णालयात दाखल 

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससून रुग्णालयात दाखल 

Next

पुणे - डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बुधवारी (20 जून) अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. 
डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार अधिकारी, माजी अध्यक्ष आणि चार्टड अकाऊंटंट यांना अटक केली़ त्यानंतर त्यांना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले़ त्यानंतर रात्री त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

तेथे जेवण घेतल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास रवींद्र मराठे यांनी आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली़ तेव्हा तेथील पोलिसांनी ही बाब तातडीने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना कळविली. त्यांच्या वयाचा विचार करता पोलिसांनी तातडीने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. याबाबत ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांनी सांगितले की, रवींद्र मराठे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दम्याचा त्रास असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. तपासणीत त्यांचा बी.पी. ही वाढल्याचे दिसून आले आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे ससून रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले़

Web Title: Bank of Maharashtra President Ravindra Marathe admitted to Sassoon Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.