बाप्पाला निरोपाची तयारी पूर्ण

By admin | Published: September 26, 2015 02:42 AM2015-09-26T02:42:38+5:302015-09-26T02:42:38+5:30

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नदीच्या सर्व घाटांवर पाण्याचे होद, निर्माल्य कलश तसेच जीवरक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Bappa full to prepare for Niropa | बाप्पाला निरोपाची तयारी पूर्ण

बाप्पाला निरोपाची तयारी पूर्ण

Next

पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नदीच्या सर्व घाटांवर पाण्याचे होद, निर्माल्य कलश तसेच जीवरक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अलका चित्रपटगृह चौकात महापालिकेच्या वतीने मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाचे स्वागत करून पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाईल.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील सर्व विसर्जन घाटांवर स्वच्छता करून घेतली आहे. कीटकनाशकाची फवारणी, गवत काढून परिसर स्वच्छ करणे ही कामे गेल्या काही दिवसांत प्राधान्याने करून घेण्यात आली आहेत. ज्या परिसरात नदी, तलाव, किंवा विहिरी नाहीत तिथे हौद तयार करून त्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर भाविकांनी बरोबर आणलेले निर्माल्य पाण्यात टाकून प्रदूषण वाढू नये यासाठी विसर्जनाच्या सर्व ठिकाणी मोठे निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहेत. भाविकांनी त्यातच निर्माल्य जमा करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
आरोग्य विभागाने मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना काही शारीरिक त्रास झाला तर त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. डेक्कन जिमखाना (जुन्या नटराज चित्रपटगृहाजवळ) व लक्ष्मी रोडवर नूतन मराठी विद्यालयाजवळ हे वैद्यकीय पथक असेल. मिरवणूक सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत ही पथके कार्यरत असतील. या पथकांमध्ये तीन शिफ्टमध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, नर्स, शिपाई तसेच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यभागात नदी असल्याने गणेश विसर्जनाची अडचण येत नाही. उपनगरांमध्ये अशी काही व्यवस्था नसल्याने महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयातंर्गत हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. वारजे कर्वे रोड कार्यालय : राजारामपूल, सूर्यनंदा लॉन, सिद्धेश्वर घाट, हॅप्पी कॉलनी, मनमोहन सोसायटी, अतुलनगर, गांधीभवन, कोथरूड. या सर्व ठिकाणी महापालिकेने जनरेटर्सची व्यवस्था करून दिलेली आहे. बिबवेवाडी कार्यालय : प्रभाग क्रमांक ६४, गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलीसबरी पार्क, वृंदावन सोसायटी, यशवंतराव चव्हाण शाळा, गंगाधाम चौक, शहा प्लॉट. या सर्व ठिकाणी महापालिकेने निर्माल्य कलशांसहित हॅलोजन दिवे तसेच जनरेटर, कचऱ्यासाठी कंटेनर अशी व्यवस्था करून दिली आहे.

Web Title: Bappa full to prepare for Niropa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.