महामोर्चाच्या तयारीसाठी बारामती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:15+5:302021-07-15T04:08:15+5:30
बारामती : ओबीसी समाजाचे पदोन्नती आणि राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. ...
बारामती : ओबीसी समाजाचे पदोन्नती आणि राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती येथे ओबीसी समाजातील सर्व जातीमधील प्रमुखांनी बारामती येथे २९ जुलै रोजी बारामती येथे एल्गार मोर्चाची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सोनगाव, झारगडवाडी, डोरलेवाडी, गुनवडी, मुढाळे, पळशी, मासाळवाडी, माळवाडी, जळगाव लोणकर वस्ती, येथे घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या दौऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, अॅड. जी. बी. गावडे, डॉ. अर्चना पाटील, बापूराव सोलनकर, संपतराव टकले, वडगावचे सरपंच सुनील ढोले, मच्छिंद्र टिंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, ज्ञानेश्वर कौले, गणपतराव देवकाते, दत्ता लोणकर, माळवाडीच्या सरपंच निर्मला लोणकर, गणेश बोरावके, पोपटराव धवडे, रवींद्र थोरात, परीट समाजाचे संदीप आढाव, नानासो मदने, विनायक गावडे, गुनवडीचे सरपंच सतपाल गावडे, नारायण कोळेकर, कुंदन देवकाते, प्रकाश देवकाते, संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते.