Baramti Vidhan Sabha Election Result 2024: बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:00 AM2024-11-23T10:00:30+5:302024-11-23T10:02:55+5:30
Baramti Assembly Election 2024 Result Live Updates बारामतीत युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांनी बारामती पिंजून काढली तर अजित पवारांनी अनेक सभा घेतल्या आहेत
Baramti Assembly Election 2024 Result Live Updates : बारामती विधानसभेत काका पुतण्या मध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या फेरीनंतर अजित पवार ९,२०६ आघाडीवर आहेत. तर युगेंद्र पवार यांना आतापर्यंत ५,००७ मत मिळाली आहेत. अजित पवारांना ११, १७१ मत मिळाली बारामती विधानसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. शरद पवारांनी पुतण्यासाठी बारामती पिंजून काढली होती. तर अजितदादांनी बारामतीत अनेक सभा घेतल्या होत्या. आता पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर असल्याचे चित्र साध्य तरी दिसते आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा चांगल्या मताधिक्क्याने लोकसभेत विजय झाला.या विजयानंतर शरद पवार गटाचा ‘काॅन्फीडन्स’ वाढला. मात्र, तुलनेने युगेंद्र पवार नवखे आहेत. शिवाय बारामती शहर आणि तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री पवार यांची मजबुत पकड आहे. त्यामुळे यूगेंद्र पवार यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या आव्हानाला त्यांना सामाेरे जावे लागणार आहे.
युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सुत्रे त्यांचे वडील श्रीनिवास पवार,आइ शर्मिला पवार यांनी हाती घेतली आहेत. युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचारासाठी मैदानात उतारले होते. अजूनही युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची चुरशीची लढत सुरु आहे. थोड्याच वेळात बारामती कोणत्या पवारांकडे जाणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.