पुणे: उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, २५ पैकी तब्बल ९ धरणे कोरडी ठाण पडली आहेत. उन्हाचा तडाखा असाच कायम राहिल्यास पाण्याने तळ गाठलेल्या धरणांतील पाणी देखील आटून जाण्याची शक्यता आहे. आज अखेर जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये केवळ २८ टीएमसी पाणी साठा शिल्लक असून, दोन महिने पाण्याचा थेंब थेंब जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.पुणे जिल्ह्यातील धरणांवर जिल्ह्यातील १३ तालुक्यासह नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. जिल्ह्यात पावसाळी हंगामात केवळ ८५ टक्के पाऊस झाल्याने धरणांमध्ये देखील केवळ ८० ते ९० टक्के पाणी साठा निर्माण झाला होता. परंतु या पाण्याचा राजकीय पुढारी व प्रशासनाने वेळीच योग्य नियोजन न केल्याने सध्या अनेक धरणांतील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. जिल्ह्यातील २५ धरणांपैकी सात धरणांमध्ये आज अखेर शुन्य टक्के म्हणजे पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. तर पाच-सहा धरणांमध्ये पाच टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. गेल्या अनेक वर्षांत जिल्ह्यातील धरणांतील पाणी साठ्याची इतकी बिकट परस्थिती कधी झाली नव्हती, असे पाटबंधारे विभागातील काही अधिका-यांनी सांगितले. धरणांमधील पाण्याची ही स्थिती असली तरी आजही अनेक ठिकाणी नद्यांमधून शेतीसाठी सरास पाणी उचले जात आहे. पिण्याच्या पाण्याचा नावाखाली धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली जात असली तरी नदी लगतच्या खजगी विहीरीमधून शेतीसाठी पाणी उचलण्याचे प्रकार राजरोज सुरु आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदी काठच्या गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होतो. याबाबत शेतक-यांमध्ये तिव्र असतोष निर्माण झाल्यानंतर हा विद्युत पुरवठा तीन तास करण्यात आला. परंतु जिल्ह्यातील काही आमदारांनी विद्युत पुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाणी योजनांमध्ये पाणी उचले देखील कठीण झाले असल्याची ओरड केली.जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणी साठा धरणाचे नावआजचा साठा टक्केवारी (टीएमसी)पिंपळगाव जागे०.०००.० माणिकडोह०.०५०.४५वडज०.२५२० विसापूर०.०००.०घोड०.०००.०चासकमान१.२०१५ पवना२.५५२९टेमघर०.२३६Þवरसगाव१.४५११ पानशेत३.४७३२ खडकवासला०.७७३८ गुंजवणी०.१११५भाटघर३.१५१३ वीर०.८४८नाझरे०.०००.० मुळशी३.९५२१ उजनी-२१.१९-३९.५५
धरणांनी गाठला प्रथमच तळ
By admin | Published: April 17, 2016 2:54 AM