सावधान! शहरातील पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:17+5:302021-02-15T04:11:17+5:30

पुणे : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा ...

Be careful! The positivity rate in the city is rising | सावधान! शहरातील पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय

सावधान! शहरातील पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय

Next

पुणे : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या आठवड्यात ५ टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या आठवड्यात तो ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या काळात रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांचे प्रमाणही जास्त होते. ८ फेब्रुवारीपासून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे.

‘सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला आहे. दैनंदिन व्यवहारांसाठी घराबाहेर पडणे अनिवार्य असले तरी हॉटेल, बागा, मॉल, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे महत्व नावालाही उरलेले नाही. नागरिक सर्रास गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता वावरताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग जणू काही पूर्णपणे गेला आहे, अशा थाटात लोक वावरत असल्यामुळे आपण आपल्यास निष्काळजीपणातून संकटाला आमंत्रण देत आहोत’, असे मत जनरल फिजिशियन डॉ. अलोक थिटे यांनी व्यक्त केले.

डॉ. शलाका पंडित म्हणाल्या, ‘वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जणू कोरोनाची भीतीच उरलेली नाही, असे वाटत आहे. दुखणे अंगावर काढायचे आणि त्रास वाढला की मग डॉक्टरकडे धाव घ्यायची, अशी मानसिकता वाढत आहे. कोरोनाची तपासणी करावी लागेल, या भीतीने नागरिकांनी स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नयेत आणि दुखणे अंगावर काढू नये.

-----------------------------------

पॉझिटिव्हिटी रेट :

आठवडा चाचण्या पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

७ - १३ जानेवारी२७,१४२ १९०२ ७.०

१४-२० जानेवारी २१२४० १५९८ ७.४

२१-२७ जानेवारी २२३५१ १३४६ ६.१

२८ जाने-३ फेब्रु. २५४७२ १२६५ ५.०

४ -१० फेब्रुवारी २०९०९ १४१६ ७.०

---------------------------------

पॉझिटिव्ह रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण :

तारीखपॉझिटिव्ह रुग्णरुग्णालयातून सोडलेले रुग्ण

४ फेब्रु २२८ ३२८

५ फेब्रु १९५ २२४

६ फेब्रु १८० २६५

७ फेब्रु १९६ २१९

८ फेब्रु १६२ १४५

९ फेब्रु २१६ १९७

१० फेब्रु २३९ १७०

११ फेब्रु २५६ ११३

१२ फेब्रु २५८ ३५०

१३ फेब्रु ३३१ २९१

१४ फेब्रु ३५४ २४८

Web Title: Be careful! The positivity rate in the city is rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.