वेळेत परीक्षा सुरू करण्याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:32+5:302021-03-14T04:12:32+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा नियोजत योग्य पध्दतीने केले नाही तर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ...

Be careful to start the exam on time | वेळेत परीक्षा सुरू करण्याची दक्षता घ्या

वेळेत परीक्षा सुरू करण्याची दक्षता घ्या

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा नियोजत योग्य पध्दतीने केले नाही तर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व तयारी वेगात करून येत्या ११ एप्रिलपासूनच परीक्षा सुरू होतील याची दक्षता घ्यावी,अशा सूचना शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीने ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सादरीकरण केले. त्यानंतर कंपनीला परीक्षेचे काम देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एजन्सी निवडीच्या प्रक्रियेला विलंब केल्यामुळे 15 मार्च रोजी सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. परंतु, विद्यापीठाने येत्या ११ एप्रिलपासून प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत चर्चा करण्यात झाली. एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन कंपनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणाची जबाबदारी स्वीकारणार असल्याने कंपनीला व्यवस्थापन परिषदेसमोर सादरिकरण करण्यास सांगण्यात आले. त्यात कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम असल्याचे दिसून आले,असे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या कंपनीकडे कोणती यंत्रणा उपलब्ध असून तिचा वापर करून परीक्षा घेणे शक्य आहे? का ? विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात कोणत्या नव्या काय सुविधा देता येऊ शकतात. परीक्षेसाठी कंपनीला कोणत्या सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता भासणार आहे? त्यासाठी कंपनी काय करणार आहे? याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादरीकरण बैठकीत करण्यात आले. परंतु, विद्यापीठाच्या पर्चेस कमिटी पुढे कंपनी निवडीचा विषय ठेवून कंपनीला अधिकृत पत्र दिले जाणार आहे.

-----------------

परीक्षा घेणे अवघड जाणार नाही

कंपनीने निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत परीक्षा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करावी.या पूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या कामात कंपनीच्या पदाधिका-यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा घेणे अवघड जाणार नाही, असा विश्वास व्यवस्थापन परिषद सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Be careful to start the exam on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.