नसरापूर : महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गावोगावी होत असतानाही त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाही, याबाबत खंत व्यक्त करून भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी शासकीय योजनांसाठी सकारात्मक राहा, असे आवाहन नागरिकांना नसरापूर येथे केले. महसूल विभागाच्या वतीने नसरापूर व परिसरातील गावांकरिता येथील जानकीराम मंगल कार्यालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार वर्षा शिंगण, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, भोरच्या सभापती नंदा शेडगे, उपसभापती रोहिणी बागल, नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, उपसरपंच सुमन घाटे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, माजी सभापती कृष्णाजी रांजणे, मंडलाधिकारी राजेंद्र कडू, सुधीर तेलंग व सहभागी गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वन कर्मचारी उपस्थित होते.यावर प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत जनतेला वेठीस धरले जाणार नाही, स्थगिती असताना सातबारे झाले असतील किंवा पुनर्वसनाबाबत कोणतेही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयात येऊन भेटावे, त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही दिली.तहसीलदार वर्षा शिंगण म्हणाल्या, की पाणंद रस्त्यासाठी मी स्वत: त्या ठिकाणी येईल. मात्र नागरिकांनी आपापसातील वाद मिटवले पाहिजेत. रस्ता सर्वांसाठीच उपयोगाचा असतो. निव्वळ दुसऱ्याला विरोध करून आपण आपलेदेखील नुकसान करत असतो. त्यासाठी नकारात्मक विचार सोडले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय योजनांसाठी सकारात्मक राहा : बर्डे
By admin | Published: November 28, 2015 12:44 AM