निवडणूक कामकाजासाठी वेळापत्रकानुसार उपस्थित रहा

By Admin | Published: February 16, 2017 02:52 AM2017-02-16T02:52:16+5:302017-02-16T02:52:16+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक कामकाजासाठी उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार

Be present on the schedule for election work | निवडणूक कामकाजासाठी वेळापत्रकानुसार उपस्थित रहा

निवडणूक कामकाजासाठी वेळापत्रकानुसार उपस्थित रहा

googlenewsNext

बारामती : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक कामकाजासाठी उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले आहे.
निवडणुक विषयी कामकाजाअंतर्गत गुरुवार दि. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता येथील प्रशासकीय भवनासमोरील कवीवर्य मोरोपंत नाट्यगृहात टपाली मतदानाकरिता मतपेटी सिलींग करण्यासाठी उमेदवारांनी उपस्थित रहावे. तसेच शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतदान केंद्रावर वापरले जाणारे मतदान यंत्र सिलींग करणे, मंगळवार दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतदान यंत्र ठेवलेला कक्ष सील करणे, गुरूवार दि. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी करीता मतदान यंत्र ठेवलेला कक्ष उघडणे, गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजल्यापासून एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी करीता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे. दिलेल्या वेळेत उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधी न आल्यास त्यांच्या अनुपस्थितीत कामकाज प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरु करण्यात येणार असल्याचे जाधव व पाटील यांनी सांगितले.

Web Title: Be present on the schedule for election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.