पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात नियम मोडून घुसखोरी करणा-या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर पीएमपी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे; तसेच या चालकांना रोखण्यासाठी बीआरटी प्रवेशद्वारावर गेट बसविण्याचा पीएमपीकडून विचार केला जात आहे. परिणामी, बीआरटी मार्गातील अपघातांना आळा बसणार आहे.शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक जलद व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या बीआरटी मार्गात इतर वाहने जात असल्याने अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत होते.त्यावर ‘लोकमत’ ने ‘अपघाताबाबत टोलवाटोलवी’ या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यानंतर पीएमपी प्रशासनाला जाग आली आणि बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-यांवर कारवाईला सुरुवात झाली.- बीआरटी मार्गातून जाणाºयांना रोखण्यासाठी दोरी लावण्यात आली. परिणामी, बीआरटी मार्गातून घुसखोरी करणाºयांवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. त्यातच काही वाहतूक पोलीस कर्मचाºयांनी सुद्धा बीआरटी मार्गात थांबून नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई केली आहे.- बीआरटी मार्गातून पीएमपी बसव्यतिरिक्त इतर वाहनांनी जाणे बेकायदेशीर आहे. पीएमपीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली. परंतु, सुरक्षारक्षकांशी वाद घालून; काही वेळा हाणामारीवर उतरून चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात घुसत आहेत.अधिकारी झाले सतर्क1बीआरटी मार्गातून केवळ बस जाणे अपेक्षित आहे; मात्र बीआरटीतून दुचाकी व चारचाकी वाहने सर्रासपणे जात असल्याने अपघात होत होते; तसेच पीएमपीच्या सुरक्षारक्षकांना स्थानिकांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते; परंतु बीआरटी मार्गातील अपघात रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आता कंबर कसली आहे.2संगमवाडी ते सादलबाबा चौक, तसेच डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी या दरम्यान बीआरटी मार्ग सुरू होतो त्या ठिकाणी दोरी लावण्यात आली आहे. दोरीला लाल रंगाचे कापड बांधले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना बीआरटी मार्गात येत नाहीत. केवळ बस आल्यानंतरच सुरक्षा रक्षक दोरी खाली घेतात, असे चित्र शनिवारी दिसून आले.अहमदनगर रस्त्यासह बीआरटीच्या पाच मार्गांवर वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. बीआरटीतून घुसणाºया वाहनांचे क्रमांक संबंधित वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनला दिल्यानंतर, नियम मोडणाºयांवर कारवाई केली जाते. काही वाहनचालकांना बीआरटीतून जाण्यास रोखल्यास त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार घडले. त्यात चार सुरक्षारक्षक जखमी झाले होते. त्यातच बीआरटी मार्गात अपघात होत असल्याने बीआरटीच्या मार्गाच्या सुरुवातीस गेट बसविण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गावर दोरी बांधून दुचाकी व चारचाकी वाहनांना रोखले जात आहे.- अविनाश डोंगरे, प्रभारी सुरक्षा अधिकारी, पीएमपी
बीआरटी मार्गावर कारवाईला सुरुवात, घुसखोर वाहनांवर पीएमपीने उगारला बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 5:27 AM