माळेगाव : आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप निर्मूलन मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आरोग्य सहायक बी. जी. कांबळे यांनी दिली. यावेळी जनजागृतीपर पत्रके वाटप करण्यात आली.
पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत माळेगाव आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात हिवताप निर्मूलन आरोग्य मोहीम राबविण्यात आली. यावेळी कंटेनर सर्व्हे करत असताना रस्त्याच्या कडेला टायर व्यावसायिक, भंगारवाले, फूलदाणी व कुंड्या तयार करणा-या लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. व्यावसायिकांकडे असलेल्या भांड्यांमध्ये जास्त दिवस पाणी साठू नये, ते कोरडी करावेत किंवा त्यामधे ऑईल टाकण्यात यावे. साठलेले पाणी वाहते करावे, स्वच्छतागृहाच्या पाईंपाना जाळी बसवावी, परिसर स्वच्छ ठेवावा, ग्रामपंचायतीच्या वतीने कोरडा दिवस पाळावा. याबाबत जनजागृती करून कोविडबाबत माहिती देण्यात आली. तसेच टायरवाले, भंगार व कुंडी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनानुसार पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली अडकमोल यांच्या सहकार्यातून राबविण्यात आल्याचे आरोग्य सहायक कांबळे यांनी सांगितले.
कुंडी व्यावसायिकांना नोटीस देताना आरोग्य सहायक बी. जी. कांबळे.
२५०६२०२१-बारामती-२०