सावधान, पुण्यात डेंग्यू, चिकुनगुनिया वाढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:44+5:302021-09-21T04:12:44+5:30
(स्टार ११९० डमी) पुणे : राज्यात सर्वच जिल्ह्यांत डेंग्यू, चिकुनगुनिया आणि कावीळचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीत ...
(स्टार ११९० डमी)
पुणे : राज्यात सर्वच जिल्ह्यांत डेंग्यू, चिकुनगुनिया आणि कावीळचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीत पाय ठेवायला जागा मिळेनासी झाली आहे. पुणे शहरातही डेंग्यूचे दररोज १० रुग्ण आढळत असल्याचे समोर आले आहे. महिन्यात साधारण १३४ रुग्ण आढळत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे.
पुणे शहर आणि परिसरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रोज सरासरी १० रुग्ण आढळत असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून येत आहे. नागरिकांनी त्यामुळे काळजी घेण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
----
१) सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
डेंग्यू - २७३
चिकुनगुनिया - १११
----
* रोज किमान १० पेशंट
पुणे शहरात रोज डेंग्यूचे १०, तर चिकुनगुनियाचे ११ रुग्ण आढळत आहेत.
----
* लहान मुलांचे प्रमाण जास्त
रुग्णांमध्ये लहान मुलांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
----
* काय आहेत लक्षणे?
डेंग्यू - तीव्र, सतत पोटदुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, झोप येणे आणि अस्वस्थता, रुग्णाला तहान लागणे आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, तसेच श्वास घेण्याला त्रास होतो.
----
चिकुनगुनिया -
भरपूर ताप येणे (साधारण १०४ अंशपेक्षा अधिक ताप येणे), हुडहुडी भरणे, थंडी वाजून येणे, सांध्याच्या ठिकाणी अतिशय वेदना होणे, सांध्यावर सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या होणे व मळमळणे, हातापायावर व पाठीवर पुरळ येणे आदी विविध प्रकारचा चिकुनगुनियामध्ये रुग्णांना त्रास होतो.
-----
कावीळ -
पित्तामधील काही रसायने त्वचेमध्ये पोहोचल्यानंतर त्वचेस खाज सुटते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या मेंदूमध्ये पित्त साठल्यास मेंदूवर कायमचा परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झालेल्या काविळीमुळे पित्ताचे खडे बनतात. डोळ्याचा आणि त्वचेचा पिवळेपणा ही सामान्य बाब आहे. गुंतागुंतीचे परिणाम सोडले तर कावीळ हा फार गंभीर आजार नाही.