पुणेकरांनाे सावधान !! पाेलिसांचा बाॅडी कॅमेरा तुम्हाला बघताेय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 08:08 PM2018-10-27T20:08:33+5:302018-10-27T20:10:23+5:30
वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरवले असून या कॅमेऱ्याच्या अाधारे पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकार्डिंग करण्यात येणार अाहे.
पुणे : वाहतूक पाेलिसांशी तुम्ही अनेकदा वाद घातला असेल. परंतु या पुढे हा वाद घालनं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण वाहतूक शाखेकडून अाता वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरुविण्यात अाले असून या कॅमेराचा वापर करुन पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकाॅर्डिंग करण्यात येणार अाहे. तसेच त्या व्यक्तीविराेधातल्या कायदेशीर कारवाईत ताे व्हिडीअाे पुरावा म्हणून वापरण्यात येणार अाहे. त्यामुळे यापुढे वाहतूक पाेलिसांशी वाद घालण्याअाधी शंभरवेळा विचार करा.
पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न करण्यात येत असतात. विशेष माेहिम राबवून वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहनचालकांवर पाेलिस कारवाई करत असताना, काही वाहनचालक पाेलीस अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांशी वाद घालत असतात. पाेलिसांना मारहाण करण्यापर्यंतही अनेकांची मजल जाते. अशा वाहनचालकांवर जरब बसविण्यासाठी वाहतूक शाखेकडून अाता नामी शक्कल लढविण्यात येत अाहे. वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरविण्यात अाले अाहेत. या बाॅडी कॅमेराचा वापर करुन संबंधित नियमभंग करणाऱ्या व वाद घालणाऱ्याचे व्हिडीअाे रेकाॅर्डिंग करण्यात येणार असून ते पुरावा म्हणून वापरण्यात येणार अाहे. त्यामुळे पाेलिसांशी वाद घालणं वाहनचालकांना अाता चांगलेच महागात पडणार अाहे.
वाहतूक शाखेकडून वाहनचालकांना नियम पाळण्याचे तसेच पाेलिसांशी वाद न घालण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.