भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्चअखेर पूर्ण करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 06:25 PM2019-11-21T18:25:48+5:302019-11-21T18:29:50+5:30

पालिकेचे पुन्हा एकदा आश्वासन

The Bhama Aaskhed Water Supply Scheme will complete in end of March | भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्चअखेर पूर्ण करणार 

भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्चअखेर पूर्ण करणार 

Next
ठळक मुद्देकाम पूर्ण होईपर्यंत टँकरने होणार पाणीपुरवठायेत्या आठ दिवसात स्थानिक लोकप्रतिनिधीची बैठकीत निर्णय घेण्यात येणार

पुणे :- कळस, धानोरी, वडगाव शेरीसह शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारी भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्च 2020 अखेर पूर्ण केली जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आज सर्वसाधारण सभेत दिली. दरम्यान, हे काम होईपर्यंत या भागाला आवश्यक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर द्वारे करण्याबाबत येत्या आठ दिवसात महापौर दालनात स्थानिक लोकप्रतिनिधी ची बैठकीत निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन यावेळी उपमहापौर दर. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले.
 पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत आज सुरवातीलाच शहराच्या पूर्व भागातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेवरून प्रशासनास धारेवर धरले. गेली अडीच वर्षे केवळ उद्या होईल, थोडेच काम बाकी आहे अशी आश्वासने दिली जात आहेत मात्र हा भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे सुरळीत पाणी पुरवठा होइपर्यंत पाणीपट्टी आकारू नका अशी मागणी यावेळी केली.
 यावर प्रशासनाकडून, भामा आसखेड च्या जॅकवेल चे काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करून, संपूर्ण प्रकल्प मार्च 2020 पर्यंत पूर्ण केला जाईल असे सांगितले. मात्र हे सांगतानाच जर आंदोलने झाली नाही तर हेही शक्य असल्याचे प्रशासनाने सांगितले. आहे. तसेच रखडलेले साडेतीन किमी च्या पाईप लाईनचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. 
        अनिल टिंगरे यांनी, भामाअसखेड योजनेचे काम बंद आहे. त्यातच लष्कर केंद्रातून  पाणी पुरवठ्याची वाहिनी फुटल्याने दोन दिवसांपासून पाणी नाही व पाणी मिटर लावल्याने पाणी चढत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमच्या भागात भामा आसखेड योजनेचे पाणी येत नाहीत तोपर्यंत मिटर लावू नयेत अशी मागणी केली. योगेश मुळीक यांनी, आवश्यक ती आर्थिक तरतूद करून ही हे काम पूर्ण का होत नाही याचा खुलासा प्रशासनाकडून मागितला.
 महेंद्र पठारे यांनी, अजित पवार पालकमंत्री असताना भामा आसखेड योजनेचे काम सुरू झाले. परंतु तेथील स्थानिक आमदारानी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचा आरोप केला. स्थानिक एजंट शेक?्यांना मिळणा?्या नुकसान भरपाई तुन कमिशन खात आहेत. या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे. 
अविनाश साळवे म्हणाले, पालिकेची इच्छाशक्ती नसल्याने काम रखडले असल्याचा आरोप केला तर, गणेश ढोरे म्हणाले, अडीच वर्षे झाली 11 गावे पालिकेत समाविष्ट होऊन आजही अनेक गावांत 8 - 10 दिवस पाणी येत नाही त्यामुळे मिळकत भर भरणार नाही असा इशारा दिला.
 यावेळी हडपसर च्या पूर्व भागात व फुरसुंगी येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले.आहे.
------
पुणे शहराच्या पूर्व भागातील समाविष्ट 11 गावांना अद्यापही भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे आज सर्वसाधारण सभेत आंदोलन झाले. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अधिक होते. गेली कित्येक वर्षे गप्प असलेले हे सदस्य आज जागे झाले यामुळे विरोधीपक्ष सदस्यांनी तुमच्या सदस्यांना तरी या विषयावर बोलू द्या असा आग्रह धरला. तर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आंदोलन करतात ही खेदाची बाब असल्याची टीका यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली.

Web Title: The Bhama Aaskhed Water Supply Scheme will complete in end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.