भरदिवसा फिल्मीस्टाईल २७ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:44 AM2018-03-27T02:44:34+5:302018-03-27T02:44:34+5:30

पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख ६० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या दोन

Bharadwisa Filmistael 27 lakh lumpas | भरदिवसा फिल्मीस्टाईल २७ लाख लंपास

भरदिवसा फिल्मीस्टाईल २७ लाख लंपास

Next

पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख ६० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. बिबवेवाडी-कोंढवा रोडवरवरील लाईट हाऊससमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. भरदिवसा व रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
याप्रकरणी अ‍ॅन्थनी बर्मन (वय ४५, रा. मार्केट यार्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व रक्कम नसरवाण पेट्रोल पंपाची होती. पंपाचे दोन कर्मचारी हे पैसे बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्मन हे धनकवडी भागातील शंकरमहाराज मठाशेजारी असणाऱ्या नसरवाण पेट्रोल पंपावर कामास आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मॅनेजर गजानन पवार यांनी कामगार अजय परदेशी (वय ४४, रा. धनकवडी) यांना बोलावले व त्यांना ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले पैसे काढण्यास सांगितले. पवार यांनी संबंधित रक्कम एका काळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये भरली. तसेच, परदेशी यांना फिर्यादी अ‍ॅन्थनी बर्मन यांना सोबत घेऊन भवानी पेठेतील बँक आॅफ इंडियाच्या भरण्यास सांगितले. त्यानुसार, परदेशी व बर्मन कारने पैशांची बॅग घेऊन निघाले. बर्मन हे कार चालवत होते. ते घटनास्थळी आले असता सीबीझेडवरून आलेल्या एकाने कारला दुचाकी आडवी लावून खाली पाडले. त्यामुळे बर्मन यांनी कार थांबवली. त्यानंतर दुचाकीस्वाराने परदेशी यांच्यावर हल्ला करून बॅग चोरली. तोच बॅग घेऊन थोड्या अंतरावर दुचाकीवर उभ्या असलेल्या व्यक्तीसोबत फरार झाला. बर्मन यांनी खाली उतरून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड व बिबवेवाडी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.

Web Title: Bharadwisa Filmistael 27 lakh lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.