भोर बनले बेकायदेशीर बांधकामाचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:02+5:302021-04-03T04:09:02+5:30

वाढ, अनेक वर्षे नगरपलिकेकडे नोंद न करता कर बुडवला जातोय. मात्र पलिकेकडून त्यांनाच सोयी सुविधा पुरवल्या जात आहे. अनधिकृत ...

Bhor became a city of illegal construction | भोर बनले बेकायदेशीर बांधकामाचे शहर

भोर बनले बेकायदेशीर बांधकामाचे शहर

Next

वाढ, अनेक वर्षे नगरपलिकेकडे नोंद न करता कर बुडवला जातोय. मात्र पलिकेकडून त्यांनाच सोयी सुविधा पुरवल्या जात आहे. अनधिकृत बांधकामाबद्दल कळवल्यास केवळ नोटीस देऊन दिखावा केला जातोय,. प्रशासनाच्या कारवाईत नगरसेवकांचा हस्तक्षेप यामुळे भोर शहर दिवसेंदिवस बेकायदेशीर बांधकामांचे शहर बनत आहे

.

भोर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विनपरवानगी, अवैध अनधिकृत बांधकामे करून राहात असलेल्यांवर आणि खासगी व सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून राहणाऱ्यांवर नगरपालिकेमार्फत कारवाई केली जात नाही.उलट त्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत.त्यामुळे नियमितपणे शासनाच्या नियमानुसार बांधकामे करून कर भरणाऱ्या नागरिकांकडून नगरपलिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

भोर शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील व सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे यामुळे भोर शहराची ओळख अनधिकृत बांधकामांचे शहर अशी होत चालली आहे. नगरपालिकेच्या हद्दीत विनापरवानगी बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.बांधकाम सुरु असल्याची माहिती नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास दिल्यानंतर केवळ दिखावा म्हणून एखादी नोटीस संबंधिताला दिली जाते. मात्र त्यास बांधकाम करण्यास नगरपालिकेतील काही पदाधिकारी मदत करतात, तर काही पदाधिकारी प्रशासनाच्या कारवाईत हस्तक्षेप करतात. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची नगरपालिकेकडे नोंदही लवकर केली जात नाही. नगरपालिकेच्या चार वर्षांनंतर होणाऱ्या सर्वेक्षणातच त्याची नोंद केली जाते. तोपर्यंत संबंधीकडून कुठलाही कर घेतला जात नाही. मात्र सदर इमारतीस पाणी व इतर सर्व सोयी पुरविल्या जातात आणि बांधकाम नियमाप्रमाणे नसले तरीही त्यास प्रमाणपत्र माञ दिले जात आहे.शहरातील मुख्य रस्त्यांच्याजवळील जुन्या बांधकामाच्या नूतनीकरणाची परवानगी घेतली जाते. आणि तेथे पूर्णत: नवीन बांधकाम केले जाते.याकडे नगरपालिका प्रशासन फारसे गांभीर्याने पाहात नाही.

अनधिकृतपणे झालेल्या बांधकामांना नोटिसा देण्यात येत असून नवीन अनधिकृत बांधकामे थांबविण्यात येतील.सर्व नागरिकांनी नवीन बांधकामे करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी नगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले जाईल. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई केली जाईल.

डाॅ. विजयकुमार थोरात मुख्याधिकारी, भोर नगरपालिका

Web Title: Bhor became a city of illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.