ग्रामविकास विभाग राज्य शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबवण्यात आलेल्या महा आवास अभियान ग्रामीणमध्ये केलेल्या कामांची ऑनलाईन माहितीनुसार राज्य व जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने मूल्यमापन करून पुरस्काराची निवड केली. यात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे या सहा जिल्ह्यातून भोर तालुक्याला सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून भोर तालुका व राज्य पुरस्कृत योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून आंबवडे ग्रामपंचायतील विभागस्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.
विभागस्तरावरील पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप झाले. विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र देशमुख, मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, अध्यक्ष जि. प. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सरपंच रोहिदास जेधे, ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे रामेश्वर राठोड, ग्रामसेवक संघटनेचे सचिव प्रसाद सोले, माणिक घोगरे उपस्थित होते.
अभियानात जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून भोर तालुका, तर भोलावडे ग्रामपंचाय द्वितीय क्रमांक व सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत आळंदे (ता. भोर) व राज्य पुरस्कृत योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आंबवडे व बहुमजली इमारत शिरवलीतर्फे भोर, उत्कृष्ट जिल्हा परिषद गट म्हणून कारी-उत्रोली गटाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. असे एकूण विभागस्तर व जिल्हास्तरीय आठ पुरस्कार भोर तालुक्याला मिळाले असल्याचे गटविकास आधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.