मेखळी गावातील ४० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये बरकडवाडी येथे काँक्रीट रस्ता, शेरेवाडी येथे काँक्रीट रस्ता व मेखळी-बरकडवाडी उर्वरित रस्ता या कामांचा समावेश आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात १ लक्ष वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून मेखळी ग्रामपंचायतीच्या वतीने मेखळी गावात देशी वाणाची ६०० झाडे लावण्याचा शुभारंभ झाला करण्यात आला. त्याचबरोबर सरपंच रणजित देवकाते यांनी मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळून १० हजार रुपये झाडांच्या ट्री गार्डसाठी मदत केली तसेच इतरही संस्था मदत करणार आहेत. यावेळी सरपंच रणजित देवकाते, सदस्य आनंद देवकाते, युवराज देवकाते, बाळासो देवकाते, दीपक भोसले, राजाराम निकम, तात्यासो इंगळे, संजय कोळेकर, संदीप चोपडे,एकनाथ चोपडे,नानासो काशिद व ग्रामसेविका सुजाता आगवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------
फोटो ओळी : मेखळी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
१४०७२०२१-बारामती-०२
--------------------------
शिल्लक बातमी