(स्टार ९५५ डमी)
पुणे : सध्या माकेर्ट याडार्त भाजीपाल्याची आवक समप्रमाणात आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील गिऱ्हाईक पुण्यातील बाजारात येऊ शकत नाही. त्यामुळे फळभाज्या आणि भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी सणांच्या पाश्व'भूीमीवर भाजीपाल्यासह आगामी सणांचा काळ यामुळे डाळींचे दर भडकणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
शेवगा, घेवडा, तोंडली, पडवळ, चवळी, दुधी, गवार, भेंडी, काकडी, कोबी, ढोबळी, गाजर, कारली, दोडका, वांगी, फ्लाॅवर, मिरची, वांगी, वाटाणा, पावटा आणि गोसावळ्याच्या भावात सध्या मोठी घसरण झाली आहे. तर लसूण, आले, टोमॅटो, भुईमूग शेंगा, डांगर, बटाटा आणि कांद्याचे भाव स्थिर आहेत. तर हरभरा, तूर, मुग, उडीद आणि मसूरचे भाव सध्या स्थिर आहेत.
----
* म्हणून डाळ महागणार...
जुलै महिन्यात केंद्र सरकारने डाळ साठा मयार्दा घातल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी डाळ खरेदीच केली नव्हती. तसेच नवीन डाळ बाजारात अजून उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आगामी सणांच्या काळात बाजारात डाळींचा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डाळींचे भाव वाढू शकतात.
- रमेश डांगी, व्यापारी
---
* म्हणून भाजीपाल्याचे भाव वाढू शकतात
सध्या भाजीपाल्याची आवक सुरळीत आहे. पण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात याचा भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजीपाल्याचे सध्या स्थिर असलेल भाव आगामी सणांच्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
---
* सर्वसामान्यांचे हाल
सध्या बाजारभाव स्थिर असले तर किरकोळ बाजारात व्यापारी पावसामुळे मालाचा कमी पुरवठा झाल्याचे कारण देत भाजीपाला चढ्या दराने विकत आहे. त्यामुळे भाव स्थिर असून सर्वसामान्यांना मात्र चढ्या दराने भाजीपाला घ्यावा लागत आहे.
- मेघा ढवळे, गृहिणी
----
* डाळींचे दर (प्रती किलो)
हरभरा - ६०
तूर - ८०
मुग - ७२
उडीद - ८०
मसूर - ७२
---
* भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)
बटाटा - १०-१२
कांदा - १८-२०
टोमॅटो - ५-८
काकडी - ६-१०
कोथिंबीर - १२-१५
पालक - १०-१५
मेथी - १०-१५
दोडके - १०-१५
लिंबू - १०
गवार - २०-३०