पीएमपीमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:20+5:302021-01-10T04:09:20+5:30
‘पीएमपी’मध्ये अनेक वर्षांपासून कर्मचारी व अधिकाºयांच्या हजेरीसाठी कार्ड पध्दत आहे. प्रत्येक कर्मचाºयाला दर महिन्याला स्वतंत्र कार्ड दिले जाते. त्या ...
‘पीएमपी’मध्ये अनेक वर्षांपासून कर्मचारी व अधिकाºयांच्या हजेरीसाठी कार्ड पध्दत आहे. प्रत्येक कर्मचाºयाला दर महिन्याला स्वतंत्र कार्ड दिले जाते. त्या कार्डवर सुरक्षा रक्षकांकडून येण्या-जाण्याची वेळ नमुद केली जाते. त्यानुसार वेतन काढण्यात येते. पण या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती. अनेकदा काही अधिकारी किंवा कर्मचारी विलंबाने येऊनही किंवा गैरहजर राहूनही या कार्डवर उपस्थिती व वेळेची नोंद होत होती. त्यामुळे पीएमपीलाही आर्थिक फटका बसत होता. या गोष्टींना आळा घालण्यासाठी कार्ड पध्दत बंद करण्यात येणार आहे.
पीएमपीमध्ये सुमारे ९ ते १० हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. पुढील महिन्यापासून या सर्वांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाईल. त्यामुळे हजेरीमध्ये पारदर्शकता येणार असून गैरप्रकार बंद होतील, अशी खात्री प्रशासनाला आहे.
------