छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा

By Admin | Published: May 11, 2017 04:17 AM2017-05-11T04:17:01+5:302017-05-11T04:17:01+5:30

छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त येत्या

Birth Anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा

छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गराडे : छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त येत्या रविवारी (दि. १४ मे) छत्रपती संभाजीमहाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर प्रतिष्ठान व समस्त शिवशंभूप्रेमी, ग्रामस्थ, पुरंदर तालुका यांच्या वतीने करण्यात आल्याचे सोहळ्याचे आयोजक पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी सांगितले.
या वेळी पुरंदर प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश शिंदे, योगेश जगदाळे आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते उपस्थित होते.
या सोहळ्यानिमित्त १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथून सद्गुरू नारायणमहाराज यांच्या हस्ते राजेंच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. त्यानंतर वीर धाराऊमाता गाडे प्रतिष्ठान व कापूरहोळ आणि नारायणपूर, पोखर, घेरा पुरंदर गावातील ग्रामस्थ ज्योती
मिरवणुकीचे मानकरी असून सायंकाळी ८ वाजता ज्योत
मिरवणूक नेणाऱ्या शिवशंभू मंडाळाचे स्वागत करण्यात येईल. रात्री ८.३० वाजता किल्ले पुरंदरवर रात्रभर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.१४ मे रोजी सकाळी ९ वाजता पुरंदर किल्ला मुख्य सभागृहात पंचायत समिती पुरंदरच्या वतीने पाळणा होईल.

Web Title: Birth Anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.