Gram Panchayat Result Pune: पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतरही भाजपचा उमेदवार पराभूत; राष्ट्रवादीच्या सीमा झांबरे प्रचंड मताधिक्याने विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:35 PM2022-12-20T17:35:10+5:302022-12-20T17:35:43+5:30
सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली
चंद्रकांत मांडेकर
आंबेठाण : कोरेगाव खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सीमा राजू झांबरे यांची मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आरती सुरेश काळे यांचा तब्बल २८८ मताने पराभव केला. पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मोठ्या लवाजम्यासह कोरेगाव येथे येऊन भाजपच्या समर्थक उमेदवार आरती काळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील काळे यांचा पराभव झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की आली आहे.
राज्याच्या मंत्र्याने ग्रामपंचायत पातळीवर येऊन प्रचार केल्याने येथील विरोधी गटाने नाराजी व्यक्त केली होती. सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलांना राखीव होते. गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी काळे आरती सुरेश आणि झांबरे सीमा राजू यांच्यात सरळ सामना होता. यात काळे यांना ४३२ मते तर झांबरे यांना ७११ मते पडली.
वॉर्डनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
* वॉर्ड क्रमांक एक ( तीन जागा ) -
१) जाधव मिनल विनायक ( १५४ मते ).
थोरात रंजना चिंधु ( ३८९ मते,विजयी ).
विद्या सतीश कडूसकर (३५५ मते,विजयी )
२) मेंगळे हॊना रामा ( बिनविरोध )
* वॉर्ड क्रमांक दोन ( तीन जागा ) -
१) गावडे कैलास तुकाराम ( १२१ मते ).
मेंगळे रामदास रघुनाथ ( १७४ मते,विजयी ).
२) गावडे सहिंद्रा राजाराम ( १९३ मते,विजयी )
मेंगळे सीताबाई ज्ञानेश्वर ( १०१ मते ).
३) गाळव काळूराम नाना ( २३० मते, विजयी )
जाधव विनायक धर्माजी ( ६३ मते )
* वॉर्ड क्रमांक तीन ( तीन जागा ) -
१) कडूसकर जया साहेबराव ( २३२ मते,विजयी ).
कडूसकर पूनम विकास ( १४८ मते ).
२) कडूसकर प्रविण विलास ( ८८ मते ).
घनवट माधुरी सुनिल ( १२२ मते ).
दोंद प्रकाश दत्तात्रय ( १७० मते, विजयी).
३) मेंगळे जिजा भिवा ( बिनविरोध ).
''भाजपकडून या निवडणुकीत पालकमंत्री यांना बोलावून खालचे राजकारण केले आहे. ही निवडणूक गावपातळीवर होऊन द्यायला पाहिजे होती.मंत्री गावात येऊन प्रचार करून गेले हे गावकऱ्यांना रुचले नाही. त्यांनी मतदानातून आपला रोष व्यक्त केला. - राजू झांबरे ( माजी उपसरपंच )''