वडगावशेरी-कल्याणीनगरात भाजपा
By admin | Published: February 24, 2017 03:22 AM2017-02-24T03:22:33+5:302017-02-24T03:22:33+5:30
प्रभाग ५मध्ये भाजपाच्या सुनीता गलांडे यांना १४,७६७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अलका कांबळे
चंदननगर : प्रभाग ५मध्ये भाजपाच्या सुनीता गलांडे यांना १४,७६७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अलका कांबळे यांना ७,१९९ मते मिळाली. शिवसेनेच्या साधना भगत यांना ५,६२६ मते मिळाली. अपक्ष अश्विनी उकरंडे यांना १,०३९ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर ८६१ जणांनी केला. भाजपाच्या सुनीता गलांडे या ७,५६८ मतांनी विजयी झाल्या.
ब गटातून भाजपाच्या शीतल शिंदे यांना १२,५८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या शिल्पा गलांडे यांना ७,८५५ मते मिळाली. काँग्रेसच्या विद्या थोरवे यांना २,७१२ मते मिळाली. शिवसेनेच्या मनीषा देवकर यांना ३,९६० मते मिळाली. मनसेच्या विशाखा गायकवाड यांना ७८४ मते मिळाली. बसपाच्या आम्रपाली वाघमारे यांना ६३८ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर ६१६ जणांना केला. भाजपाच्या शीतल शिंदे यांचा ४,७२९ मतांनी विजयी झाल्या.
क गटातून योगेश मुळीक यांना १२,५८९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नारायण गलांडे यांना ११,१८५ मते मिळाली. शिवसेनेचे नितीन भुजबळ यांना २,९९४ मते मिळाली. काँग्रेसचे संतोष गलांडे यांना १,७०२ मते मिळाली. बसपाचे खान अजहर मेहबूब यांना ३९७ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर २६७ जणांनी केला. योगेश मुळीक हे १,४०४ मतांनी विजयी झाले.
ड गटातून भाजपाचे संदीप जऱ्हाड यांना १०,२३८ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या प्रकाश गलांडे यांना ७,७५१ मते मिळाली. शिवसेनेचे सचिन भगत यांना ७,०६८ मते मिळाली. काँग्रेसचे योगेश देवकर यांना ३,१६६ मते मिळाली. बसपाचे प्रकाश त्रिभुवन यांना ७७८ मते मिळाली. येथे नोटाचा ४९१ जणांनी वापर केला. भाजपाचे संदीप जऱ्हाड हे २,४८७ मतांनी विजयी झाले. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयातील दोन विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला आहे. वडगावशेरीचे नगरसेवक सचिन भगत, तर विमाननगरच्या नगरसेविका उषा कळमकर यांना पराभव पत्करावा लागला. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयात भाजपाचे केवळ एक नगरसेवक होता. ती स्ांख्या आता ८ झाली आहे. नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक होते. या वेळी केवळ ४ निवडून आले. काँग्रेसकडे एक नगरसेविका असताना या वेळी खातेही उघडता आले नाही. शिवसेनेचा १ नगरसेवक होता. गेल्या वेळी भाजपाचा एकच नगरसेवक होता या वेळी तब्बल ८ नगरसेवक निवडून आले आहेत. १२ जागांपैकी ८ वर भाजपा, तर ४ जागांवर राष्ट्रवादी विजयी झाले आहे. राष्ट्रवादीच्या ३ जागा कमी झाल्या आहेत. (वार्ताहर)