पुणे: विद्यार्थांनी फी न भरण्याच्या मुख्य कारणावरून शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये. तसेच फी भरण्यास उशीर झाल्यावर पालकांना दंड आकारला जाऊ नये. अशा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वात पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
पालकांकडून शालेय संस्थांविरोधात विविध तक्रारी येऊ लागल्या आहेत. संस्थांनी विद्यार्थी आणि पालकांना अडचणीत आणले. तर भाजप युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल असा इशारा मानकर यांनी दिला आहे.
कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक फायद्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. फी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने यांनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हाफ्याने फी भरण्याची मुभा मिळावी. उशिरा फी भरणार्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड आकारू नये. ऑनलाईन क्लासरूम मधुन विद्यार्थ्यांंना काढले जाऊ नये. ज्या सुविधांचा वापर या वर्षात झालेला नाही त्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जाऊ नये. शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला आडवणे. असे प्रकार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी. गेल्या १ वर्षात यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्त्या पुरुषाने कोरोनामुळे जीव गमावला असेल. अश्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी विनंती त्यांनी पुणे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना केली आहे.
याबाबत आपल्या संस्थेच्या संबंधात काही तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यास आपल्या विरोधात नाईलाजाने आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे.